महिला बालकल्याणच्या प्रमाणपत्रावर आक्षेप

अहमदनगर: जिल्हा परिषदेतील महिला बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिकांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बदलीत सवलत घेतली. अशा कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रमाणपत्रे ससून रुग्णालयातून पडताळणी करून आणण्याचे अध्यक्ष जि. प. प्रशासनाने दिले होते. मात्र महिला व बालकल्याण विभागातील काही पर्यवेक्षकांनी ही पडताळणी अद्याप केलेली नाही. विशेष बाब म्हणजे श्रीरामपूर तालुक्यात कार्यरत असलेल्या एक पर्यवेक्षिका दिव्यांग संवर्गातून भरती झाल्या आहेत. त्या पडताळणीस गेल्या असता ससून रुग्णालयात ओपीडी विभागात त्यांची तपासणी झाली. मात्र त्यांना पडताळणी प्रमाणपत्र दिलेले नाही. दरम्यान या पर्यवेक्षेने प्रशासनाला लेखी पत्र दिले, असून माझे दिव्यांगत व जन्मजात नसून त्यात काळानुरूप बदल होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे आपण बदलेसाठी दिव्यांगपणाचा लाभ घेतलेल्या नसून भविष्यातही घेणार नाही. अशी हमी पत्रात दिली आहे, मग बदलीच्या सेवा जेष्ठता यादीत या कर्मचाऱ्यांचे नाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी कसे ठेवले? सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पर्यवेक्षिकेने दिव्यांग प्रवर्गातून शासकीय नोकरी मिळवली? त्याचे काय या सर्व बाबी संशयास्पद असल्याने कारवाई करावी अन्यथा आंदोलन केले जाईल.असा इशारा पोकळे व पोपट शेळके यांनी दिला आहे.