जनशिक्षण संस्थेचा अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महिला व युवतींसाठी कौशल्यक्षम प्रशिक्षणाचे आयोजन

महिला आत्मनिर्भर झाल्यास कुटुंबाची व समाजाची प्रगती होते.....

अहमदनगर : मेट्रो न्यूज  

जनशिक्षण संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महिला व युवतींसाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण व रोजगाच्या संधी या विषयावर आयोजित मार्गदर्शन व्याख्यानात हनिफ शेख बोलत होते.यावेळी व्यवस्थापकीय कमिटीचे व्हाईस चेअरपर्सन मनीषा शिंदे, सदस्या पूजा देशमुख, संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, प्रशिक्षिका माधुरी घाटविसावे, लेखापाल अनिल तांदळे, उषा देठे, विजय बर्वे आदींसह प्रशिक्षणार्थी युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला व युवतींमध्ये रोजगार कौशल्य निर्माण करण्याचे काम जन शिक्षण संस्थेने केले. महिलांना आत्मनिर्भर करुन रोजगाराचा मार्ग दाखविण्याचे कार्य अविरतपणे संस्था करत आहे. अनेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाची प्रगती साधली. महिलांनी स्वतःचे कौशल्याची आवड ओळखून त्या क्षेत्राचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन स्नेहालयाचे सहसंचालक हनिफ शेख यांनी केले.

महिलांनी मोठी स्वप्न पाहून, ते स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्यास यश निश्‍चित मिळत असते . नगर जिल्ह्यात 35 हजार महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे जनशिक्षण संस्था करण्यात आले.     जनशिक्षण संस्था कौशल्यक्षम भारत घडविण्यासाठी योगदान देत आहे . तसेच सरकारी प्रशिक्षण असले, तरी अद्यावत प्रशिक्षणाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य जनशिक्षण संस्था करत असते . महिला आत्मनिर्भर झाल्यास कुटुंबाची व समाजाची प्रगती होणार असून, यासाठी त्यांच्यामधील कौशल्य विकसित करण्याची करणे आवश्यक असते.
महागड्या व्यावसायिक प्रशिक्षणाचे कोर्स अल्प दरात जनशिक्षण संस्थेत उपलब्ध असतात . हे प्रशिक्षण दर्जेदार पद्धतीने शिकवले जात असून, महिला-युवतींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य सुरु असल्याचे प्रशिक्षणार्थी युवती व महिलांनी यावेळी भावना व्यक्त केली.