जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख नगर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन.

भूमी अभिलेख कार्यालयातून 65 वर्षाच्या शेतकऱ्याला तीन वर्ष होऊन देखील न्याय मिळत नसल्याचा आरोप.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील सांडवे येथील शेतकरी श्री.एकनाथ राधाजी खांदवे यांच्या गट नं. 334 वरील मोजणीचा उल्लेख हा आपल्या नोटीस मध्ये तसेच नकाशामध्ये आहे.परंतु त्यातील अतिक्रमण क्षेत्राचा उल्लेख नसल्याने,तो मिळावा या मागणीसाठी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पत्र दिले होते. परंतु आजपर्यंत जवळपास ९ ते १० महिने उलटून देखील त्याबाबत अद्याप पर्यंत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी कुठल्याही प्रकारची लेखी आम्हाला कळविले नाही. शेतकरी एकनाथ खांदवे यांचे आज  वय 65 वर्ष आहे. मागील  तीन वर्षापासून ते या गोष्टीचा भूमि अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहेत.त्यांच्या आजपर्यंत जवळपास शंभरच्या वर चक्रा या एका कामासाठी झालेल्या असून देखील, या भ्रष्ट भूमि अभिलेख विभागाला त्यांची कुठल्याही प्रकारची दया आली नाही.अद्याप पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांच्या बाबतचा ठोस निर्णय घेतला नसल्याने  आज त्याचा निषेध नोंदवत, जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने भूमिअभिलेख कार्यालय नगर तालुका यांच्या कार्यालयात, ठिया आंदोलन करण्यात आले .यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शेतकरी एकनाथ खांदवे, रामदास कोतकर, एकनाथ बोटे, अमित गांधी, दीपक गुगळे, शहानवाज शेख, गौतमीताई भिंगारदिवे, रोहिणी पवार आदी उपस्थित होते.   पुढे निवेदनात म्हटले आहे की जोपर्यंत शेतकरी एकनाथ खांदवे यांना न्याय मिळणार नाही व जन आधार सामाजिक संघटनेच्या पत्राला उत्तर मिळणार नाही तोपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयात आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगीतले……….

आंदोलनाचे यश (चौकट)- नगर तालुका भूमि अभिलेख उपअधीक्षक मिसाळ म्हणाले की सदर प्रकरणाची चौकशी करून येत्या ८ दिवसाच्या आत शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले….