दिवसाड पाण्यासाठी शेवगा वात महिलांचे शोले स्टाईल आंदोलन
दिवसाड पाण्यासाठी शेवगा वात महिलांचे शोले स्टाईल आंदोलन
शहराला दिवसाढ पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच शहरासाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या स्वातंत्र्य पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात येईल या मागणीसाठी शहरातील महिला कृती समितीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल केले. दरम्यान काही संताप्त महिलांनी नळाला येणारा गाळ मिश्रित पाणी मुख्य अधिकाऱ्यांवर फेकण्याचा प्रयत्न केला मात्र आयोजक महिलांनी त्यांना आवरले. शहरातील पाण्याची पाईपलाईन जीर्ण झाली असल्याने दूषित पाणीपुरवठा होतो त्यामुळे पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागते पाणी टंचाईच्या समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो त्यामुळे आवाज उठवण्यात आल्याचे सांगण्यात आली आंदोलनात स्नेहल फुंदे ,सीमा बोरुडे, विना नांगरे, सुनीता काथवटे, गीता बाहेती ,शोभा शिनगारे, उषा कथवाटे, बालिका फुंदे ,शुभांगी मुळे ,बबीता मगर ,प्रतिभा नाईक ,शारदा सोनवणे, वैशाली बडधे ,कल्पना घोलप, हिराबाई शिंदे ,सुरेखा जाधव, शिवकन्या बोरुडे ,मनीषा खेडकर, प्रतिभा राऊत, मीना कथावटे, यमुना शिंदे ,सविता घनवट सहभागी झाल्या.