गारपिटीमुळे उजाडलेली द्राक्षबाग नाशिकच्या शेतकऱ्यांने स्वतःच्या हाताने कापून टाकली

भाऊ 68 वर्षाच्या आयुष्यात अशी गारपेट पाहिली नाही पंधरा मिनिटात होत्याचं नव्हतं झालं गारपिटीने भाग पूर्ण पाण्यात गेली भाऊ आम्ही खूप स्वप्न पाहिली होती पण नियतीला मान्य नव्हती आता बाग ठेवून काहीच फायदा नाही ती तोडलेली बरी असे म्हणत 68 वर्षाचे विश्वनाथ जगताप थरथरत्या हाताने द्राक्षबाग तोडण्यात पुन्हा एकदा मग्न झाली गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात अनेक भागांमध्ये गारपिटीचा तडाखा बसल्याने अनेक द्राक्ष बाग या तडाखा बसल्याने अनेक द्राक्ष बाग या खुडा होण्याआधीच शेवटच्या घटका मोजत असल्यामुळे शेतकरी त्या तोडणे योग्य समजत आहेत चांदवड तालुक्यातील वाकी खुद्द येथील शेतकरी त्यांच्या तिन्ही मुलांनी दोन एकर थॉमसन व एक एकर सोनाका हे द्राक्ष पीक घेतले कोरोना काळात 17 ते 18 लाख रुपयांचे वार्षिक नुकसान त्यांनी सोचले असताना देखील यंदा सुमारे नऊ लाख रुपये द्राक्ष बागावर खर्च केले लागवड करून फक्त पाच वर्षे झाली होती अजून पंधरा वर्षे क्षमता असलेली चांगली दर्जाची बाग टिकवण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाईपलाईन केली यांना घड चांगले लागल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खुडा चालू होणार होता त्यातून वीस ते पंचवीस लाख रुपयांची उत्पन्न अपेक्षित होते दोन वर्षांपूर्वी सोसायटीचे कर्ज फेडल्यामुळे आता घरचे नूतनीकरण धाकट्या मुलाचं लग्न आणि चार चाकी गाडी घ्यायचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं पण गारपिटीने ते स्वप्नच राहून गेले घरातील तीन मुलं व मजूर लावून त्यांनी सोमवारपासून ही बाग तोडण्यास सुरुवात केली अशा स्थिती इतरही शेतकऱ्यांची असून त्यांनीही शासनाने तातडीने मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे