निमगाव वाघाचे मल्ल गणेश फलके याने कुस्तीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल सत्कार…

   अहमदनगर:मेट्रो न्यूज

निमगाव वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे झालेल्या कुस्ती हंगामात मानाच्या कुस्तीत विजय मिळवून चांदीची गदा पटकाविल्याबद्दल नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघ,  स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
गावात नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी पैलवान फलके यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, दुध डेअरी चेअरमन गोकुळ जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, नगर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव पै. संदीप डोंगरे, अनिल डोंगरे, बबन शेळके, भानुदास ठोकळ, भाऊसाहेब जाधव, राम जाधव, श्याम जाधव, भरत बोडखे, अतुल फलके, नामदेव फलके, पोपट शिंदे, अजय ठाणगे, जालिंदर आतकर, गुलाब केदार, गणेश जाधव, भानुदास कापसे, विजय जाधव, ज्ञानदेव कापसे, विशाल फलके, उध्दव फलके, प्रमोद जाधव, भाऊसाहेब कापसे, भाऊ जाधव, पिंटू जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावाच्या यात्रेत रंगत असलेल्या कुस्ती हंगामात युवा मल्लांना प्रोत्साहन मिळत आहे. ग्रामीण भागातून अनेक नामवंत मल्ल घडत असून, कुस्तीचा वारसा पुढे चालविण्याचे काम नवोदित मल्ल करत आहे. या खेळाला सर्वांच्या प्रोत्साहनची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश फलके हा पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय काका बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. फलके यांना कुस्ती खेळाचा मोठा वारसा असून, त्याचे पंजोबा स्व.पै. धोंडीभाऊ फलके हे जिल्ह्यातील नामवंत पैलवान होते. उद्योजक कोंडीभाऊ फलके यांचा तो पुतण्या असून, फलके कुटुंबातील कुस्तीचा वारसा तो पुढे चालवीत आहे.