व्हाॅटस्अप ग्रुपमुळे गावचं रूपच पालटल…

उद्योजक अंबादास जाधव यांच्या पुढाकारातून सुरू झालेला व्हाट्सअप ग्रुपने जणू गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. व्हाॅटस्अप ग्रुपमुळे जमले लाखो रूपये अन् गावाच्या रूपड पालटल. मंदिर, शाळा, गावच्या वेशीच्या कामाला गती.

उद्योजक अंबादास जाधव यांनी साधारण पंधरा दिवसांपूर्वी एक प्रयास ‘गाव विकासाचा’ या नावाने व्हाट्सअप ग्रुप सुरू केला. हा ग्रुप खरंतर गावच्या विकासाच्या उद्देशाने सुरू केला होता. गावच्या विकासाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना त्यांनी सुरुवातीला स्व:खर्चातून हातोळण औरंगपूर येथील हनुमान मंदिराच्या अर्धवट असलेल्या कामाला सुरुवात केली. मंदिरातील फरशी बसवली. संपूर्ण मंदिराचे रंगकाम केले आणि इथूनच खरी सुरू झाली गाव विकासाची चळवळ.

पुढे व्हाट्सअप ग्रुपवर अंबादास जाधव यांनी गाव विकासाच्या संकल्पना स्पष्ट करताना मदतीचे आव्हान केले. गावात चांगले काम होत असल्याने पाहून लोकांनी देणगी देण्यास सुरूवात केली.  त्या देणगीच्या पैशातून जगदंबा देवी मंदिरातील दीपमाळ आणि मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. त्याचे फोटो ग्रुपवर व्हायरल केले. ते पाहून नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई, पुणे, सुरत येथे असलेल्या नागरिक व तरूणांकडून देणगीचा ओघ सुरू झाला. आता या देणगीतून गावची वेस उभारण्यात येणार आहे. त्याचा पाया शोधण्यात आला असून साहित्य येऊन पडले आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची देणगी गोळा झाली आहे. त्या देणगीतून अशी विधायक कामे करण्यात येणार आहेत. गावातील मंदिरांबरोबर शाळा ही डिजिटल करण्याचा मानस गावातील तरुणांनी व्यक्त केला आहे. या कामामध्ये गावातील नागरिक आर्थिक, साहित्य, श्रमदानातून आपला सहयोग देत आहेत.

देणगीतील विकास कामे :
जगदंबा देवी दीपमाळ उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिरात पेव्हिंग ब्लॉकचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे. औरंगपूरमधील मंदिराचे काम करून मंदिराला लोखंडी प्रवेशद्वारही बसविण्यात आले आहे. मंदिराचे रंगकामही करण्यात आले आहे.

गावात कायमस्वरूपी दवाखाना :
हातोळण औरंगपूर गाव बीड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने इथे नेहमीच आरोग्य सेवेचा बुधवार असतो अनेकदा पावसाळ्यामध्ये साथीचे रोग बळावतात बळावतात त्यामुळे गावात दवाखाना उभारण्यासाठी तरूण मंडळी पुढाकार घेणार आहे.

देणगीचा ओक असाच सुरू राहिल्यास स्मशानभूमीमध्ये घाट बनविण्याचा मानस आहे. त्याचबरोबर छोटे गार्डन ही तिथे तयार करण्यात येणार आहे. गावातील जिल्हा प्राथमिक शाळेला डिजिटल करण्यासाठी उपकरण उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.असे उद्योजक अंबादास जाधव यांनी संगितले.