चक्रवात बुरेबी हे तिरुअनंतपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

दक्षिण भारतातील राज्यांना धोका....

 

निवार  हे चक्रीवादळ कुठे  शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून आज शुक्रवारी ते केरळ आणि तमिळनाडूच्या  किनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी गुरुवारपासून मुसळधार पावसाने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे.  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेतून हे वादळ पंबन येथे धडकणार असून तेथून ते कन्याकुमारीच्या तटवर्ती क्षेत्राकडे सरकणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेतून हे वादळ पंबन येथे धडकणार असून तेथून ते कन्याकुमारीच्या तटवर्ती क्षेत्राकडे सरकणार आहे. या चक्रीवादळामुळे कोडावसल, नागपट्टिणम, वदारनयाम, कराईकल, मुदुकुलाटून या कावेरी त्रिभुज परिसरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी 10 ते 20 सेमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या किनारी भागातील जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

बुरेवी चक्रीवादळ आज  तिरुवनंतपुरमच्या किणाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.