ऋषिकेश राऊत
भुसावळ – मुक्ताईनगर महामार्गावर बायोडिझेलचा काळाबाजार करणाऱ्या युसूफ खान त नूर खान, आफताब अब्दुल कादर थे राजकोटीया (रा. वरणगाव) व बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (रा.आजमगड, उत्तर री प्रदेश) या तिघांना स्थानिक गुन्हे नी शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री श्री तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून २० लाख ७५ हजार रुपये किमतीचे २५ हजार लिटर डिझेल, दहा लाख रुपये किमतीचा ट्रक, १ लाख २० हजार ७०० रुपये किमतीचे यंत्र व इतर साहित्य असा ३९ लाख ९५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जालिंदर पळे, फौजदार युसूस शेख, सुनील दामादरे, दीपक पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, दर्शन ढाकणे व भारत पाटील यांनी केली.