राज्यस्तरीय भारोत्तोलन स्पर्धेत ७६ किलो खुल्या वजनी गटात, डॉ. युती धूमकेकरने मिळवले कास्य पदक

अहिल्यानगर(प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय भारोत्तोलन (पॉवर लिफ्टिंग) स्पर्धेत अहिल्यानगरच्या डॉ. युती धूमकेकर यांनी कांस्यपदक पटकावले.स्टेशन रोडवरील सिटी जिम मध्ये न्यूट्रीशियन एक्स्पर्ट असलेल्या युती धूमकेकर यांनी अवघ्या दोन महिन्याच्या सरावात हे यश प्राप्त केले. त्यांना मुंबई येथील प्रशिक्षक वेदांत पावनीकर, सिटी जिम चे संचालक ओंकार गिरवले, राज मुनोत यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन मुंबई यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज कर्जत आणि पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. राज्यस्तरीय सिनिअर व मास्टर पुरुष गट व महिला गट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत युती धूमकेकर यांनी कास्य पदकाची कमाई केली.
आता त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्यात ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्या ठिकाणी पदक मिळवून त्यांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा मानस आहे.
अहिल्यानगरच्या वै. पं. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या युती या मूळच्या वाशीम जिल्यातील असून गेल्या ८ वर्षांपासून न्यूट्रीशियन एक्स्पर्ट म्हणून त्या नगरमध्ये महिलांना वजन वाढवा अथवा कमी करा याविषयी मार्गदर्शन करतात. न्यूट्रिशन फूड स्टोअर देखील त्या चालवितात.
भारोत्तोलन या विषयी त्यांना काही माहिती नव्हती. पण मागील वर्षी त्यांनी सहज जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्या अव्व्वल ठरल्या. त्यांना मागील महिन्यात स्ट्रॉग वुमन ऑफ अहमदनगर हा किताब मिळाला आहे.
सिटी जिम मध्ये दररोज चार तास त्या सर्व करतात. दररोज ८ किलोमीटर चालणे, योगा, जिम यावर त्या भर देतात.
सिटी जिम मध्ये एक ट्रेनर म्हणून काम करीत असताना युती यांच्या मध्ये पॉवर लिफ्टिंग चा स्पार्क आम्हाला दिसला आणि आम्ही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले. आणि अवघ्या दोन महिन्याचा सराव करून त्यांनी हे यश सपांदन केले हे एक नगरच्या महिला खेळाडूच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे ओंकार गिरवले यांनी सांगितले.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.