स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री करताना शिर्डी येथील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री करताना शिर्डी येथील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शिर्डी येथे अवैधरित्या सुगंधी तंबाखू व पानमसल्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.स.ई. तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, पोकॉ अमृत आढाव व संभाजी कोतकर यांचे पथक नेमून शिर्डी येथील अवैध पानमसाला गोडावूनवर छापा टाकण्यासंदर्भात सूचना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी साजीद पठाण व आबीदखान पठाण रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी यांचे राहते घरातील तळमजल्याच्या खोलीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी एक संशयीत इसम गोण्यांमधून पुडे काढताना दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून संशयीत इसम उभा असलेल्या तळघराची झडती घेता त्यामध्ये विविध प्रकारची सुगंधी तंबाखु व गुटखा पानमसाला मिळुन आला- त्याबाबत विचारपुस केली असता आरोपीने सदर माल हा त्याचा भाऊ आबीदखान साहेबखान पठाण याने आणला असून दोघे मिळुन विक्री करतो, अशी माहिती दिल्याने आरोपीस महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन शिर्डी पो.स्टे. गु.र.नं. १०६७/२३ भादंवि कलम ३२८, १८८, २७२- २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.