मुंबईत आझाद मैदानावर 8 डिसेंबरला शांती सभा

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळून दोन्ही देशांच्या शांतता प्रस्थापित व्हावी. यासाठी आठ डिसेंबरला आझाद मैदानावर सर्व धर्मीय शांतीसभा आयोजित केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ही सभा राजकीय नसल्याने यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांना आमंत्रित केलेले नाही. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण व्हावी. लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी ही शांती सभा आहे. असेही यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले.