प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत अभ्यासक्रमात हवामान बदला सह पर्यावरणाचा ही समावेश

2019 मध्ये हवामान बदल आणि सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांमध्ये भारत सातव्या स्थानी होता. यात 2267 लोकांचा मृत्यू झाला. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार हवामान बदलावर काम करणाऱ्या 59 देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानी आहे. तसेच यापासून पीडित देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. भारत तरुणांना जागृत करत हवामान बदलाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत अभ्यासक्रमात हवामान बदल, त्याचे परिणाम व त्यावरील उपायांसह पर्यावरणाची माहिती दिली जात आहे. तिसरी ते पाचवी पर्यंत हवामान बदल असे संबंधित काही मुद्दे समाविष्ट केले आहेत. सहावी ते आठवीत भूगोल व विज्ञानात नववी ते बारावीत इंग्रजी भूगोल व विज्ञानात आहे. 2023 मध्ये यूजीसी ने पदवी पूर्व मध्ये पर्यावरण शिक्षण अनिवार्य केले आहे. हवामान बदल व त्याचे तोटे कमी करण्यासाठी नॅशनल वॉटर मिशन, नॅशनल मिशन फॉर स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज आदी योजना सुरू केल्या आहेत.