नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांची घोषणा

यापुढील नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा

छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणाने भारताने गुलामीचे मानसिकता मागे टाकली. जो समुद्रावर नियंत्रण राबतो तो सर्व शक्तिमान असल्याचे महाराजांनी शिकवलेले याच प्रेरणेने भारतीय नौदल काम करत असल्याचा अभिमान आहे म्हणूनच गेल्या वर्षी आपण नौदल सेनेच्या ध्वजावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला स्थान दिले आता नौदलांच्या गणवेशावर राजमुद्रा असेल इतकेच नव्हे तर नौदल यातील पदांनाही भारतीय पदांची पद्धतीची नावे दिल्या जातील, अशी घोषणा प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले भारतीय नौदल दिनानिमित्त मालवण येथील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. या वेळी म्हणाले,सशस्त्र नारीशक्ती योजनेअंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. नौदलत देशासाठी पहिल्या महिला कमांडर पदी महिलेचे नियुक्ती केल्याबद्दल मी या विभागाचे अभिनंदन करतो कोकणच्या विकासावर बोलताना मोदी म्हणाले, चिपी विमानतळ सुरू आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरही माझ्या गावापर्यंत जोडले जाईल. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना केंद्र तयार करत आहे.अकरा राज्यांमध्ये खारफुटीचा भाग वाढवणार वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोकणातही रत्नागिरी देवगड मालवण या किनारी भागातही विकास कामे होतील.