सौंदाळ्याच्या ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

विधवाही लावणार कुंकू आणि पुनर्विवाहाला ही देणार निधी

कुकाणे : नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायत न मासिक सभेत विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव नुकताच संमत केला. या अंतर्गत गावातील विधवांना दागिने परिधान करता येणार असून कुंकू टिकली,लावता येणार आहे. तसेच पुनर्विवाहाच्या निर्णयाला सुद्धा ग्रामपंचायतीकडून 11000 रुपये कुटुंब आधार निधीचा लाभ देणार येणार असल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली. विधवा होण्यामागे कुठल्याही स्त्रीचा कुठलाच हात नसतो किंवा तिचा दोषही नसतो. ती विधवा झाल्यानंतर मात्र तिच्या कुटुंबावर, तिच्यावर कुटुंब चालवण्याची जबाबदारी येते. ती कुटुंबाप्रमुखाच्या भूमिकेत असते. अशा वेळी विधवांना समाज आधार देत नाही. सण उत्सवापासून अशा महिलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनिष्ट प्रथा आपणही समाजात पाळायला भाग त्या स्रिला पाडतो.तिने दागिने घालायचे नाही कपाळावर कुंकू किंवा टिकली लावायची नाही हे निर्बंध मात्र अजूनही बऱ्याच समाजांमध्ये पाळले जातात.शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या त्रासातून गेलेल्या आहेत.अजूनही काही प्रमाणात जात आहे. मात्र काही प्रमाणात शिक्षित स्त्रियांना सुद्धा समाज याच पद्धतीने वागवताना दिसतो.अशा पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असाच आहे. कारण वैधव्य आल्यानंतर पुरुषांना देखील लाजवेल एवढे कष्ट करून स्त्री ही नेहमीच कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असते. आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करून शिक्षण देऊन समाजात स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम बनवत असते. हा सगळा विचार करत नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने वाढदिवस, रक्षाबंधन व भाऊबीजेच्या निमित्ताने सौंदळे गावातील जी व्यक्ती विधवा महिलांच्या हस्ते वळून घेईल त्यांना ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी 26 जानेवारीला गौरवण्यात येईल. गावातील विधवा पुनर्विवाह परवानगी देऊन पुनर्विवाहसाठी ग्रामपंचायतीकडून 11000 रुपये कुटुंब आधार निधीचा लाभही देण्यात येणार आहे. असे जाहीर केले आहे.