येरवडा कारागृहाचे अधिकाऱ्याला अटक ललित पाटील प्रकरण
येरवडा कारागृहाचे अधिकाऱ्याला अटक
ललित पाटील प्रकरण
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय काशिनाथ मरसाळे याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने 60 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मरसाळे यांनी ललित पाटील याला ससून रुग्णालयात उपचारासाठी तसेच तेथून पळून जाण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी मरसाळे यांनी भूषण पाटील, अभिषेक बलकवडे या दोघांची वेळोवेळी भेट घेतली बळकवडे यांच्यासोबत व्हाट्सअप चॅटिंग व मोबाईलवर कॉल केले. या अटकेमुळे ललित पाटील प्रकरणात आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 14 झाली आहे. ललित पाटील यांचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी त्याला मदत केल्याच्या मरसाळे यांच्यावर आरोप आहे. ललित पाटील यांच्या आजारावर कारागृहात उपचार करणे शक्य असतानाही त्याला ससून रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यासाठी डॉ. मरसाळे यांनी मदत केली होती