शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार जगताप

अहमदनगर

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची निवड करण्यात आली आहे .

आयुर्वेद महाविद्यालयातील सभागृहात शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांच्या निवडीचे पत्र मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे आणि प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .

यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते,  प्रा. मेघा काळे,  चंद्रकांत पालवे , मसपाचे जयंत येलुलकर ,  श्रीराम जोशी , शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी , खजिनदार भगवान राऊत,  कार्याध्यक्ष प्रा.  डॉक्टर अशोक कानडे,  प्रा. डॉ. बापू चंदनशिवे , डॉ. श्याम शिंदे,  प्राचार्य विश्वासराव काळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

आमदार जगताप म्हणाले गेल्या पंधरा वर्षापासून वाचत ,  ऐकत अनुभवत आलेलो असून शब्दगंध ही नवोदित साहित्यकांना पुढे आणणारी चळवळ आहे .नव्या पिढीवर चांगले साहित्य संस्कार होण्यासाठी शब्दगंधाचा नेहमीच प्रयत्न असतो