विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक-2022 महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची प्रचारात आघाडी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा महाविकास आघाडीतील देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार ,काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले ,खासदार सुप्रियाताई सुळे,आमदार रोहित पवार ,आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे ,आमदार संग्राम जगताप व पॅनल प्रमुख पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत आहे. 

यावेळी बोलताना यादव संजय शंकर म्हणाले की विद्यार्थी व प्राध्यापक वर्गांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांना न्याय देण्यासाठी विध्यार्थी व प्राध्यापक हिताचा आमचा जाहीरनामा घेऊन आम्ही प्रचारात उतरलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज , ,छत्रपती शाहू महाराज ,महात्मा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार घेऊन आम्ही निवडणूक लढवीत आहे. विद्यापीठ निवडणुकीसाठी मतदारांना प्रचारानिमित्त भेटत असताना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल निवडणूक जिंकणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक -2022 मध्ये पॅनेलचा जाहीरनामा त्यांनी यावेळी सांगितला .

 

यामध्ये विद्यापीठात नऊ हजार क्षमतेचे वसतिगृह निर्माण करणार आहे. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना काम देऊन मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर यांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देणार आहे .विद्यापीठात व्यवसायभिमुख अभ्यासक्रम देण्यासाठी आमचं प्राधान्य असणार आहे .  संस्कृती क्रिडा या विभागांना चालना मिळण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आहे, प्राध्यापक प्राध्यापिका रिक्त जागांसाठी प्रयत्न करणार आहे .सारथी ,बार्टी ,महाज्योति ,टी आरटीआय या स्वायत्त संस्था अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी माहिती मिळावी यासाठी प्रसार कॉलेज स्तरापासून करणार आहे. विद्यापीठ स्तरावरील कॅम्पस प्लेसमेंट ची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .सर्व जाहीरनामा हा विध्यार्थी व प्राध्यापक हिताचा असल्याने सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल पदवीधर खुल्या प्रवर्गातील पदवीधर उमेदवार संजय शंकर यादव यांनी आपली पार्श्वभूमी सांगितली. यावेळी बोलताना म्हणाले की शैक्षणिक व सामाजिक जीवनातील माझी वाटचाल ही सेवा ,कर्तव्य या भावनेतून झाली आहेविद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून मी भविष्यात काम करणार आहे
ज्यास्तीत ज्यास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे

गेल्या 30 वर्षांपासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेमध्ये प्राचार्य या पदावर काम करीत असल्याने विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे सर्व प्रश्न माहीत असून ते सोडविण्यासाठी मला नक्कीच अनुभव असल्याने सोप्पे जातील असा देखील त्यांनी मानस व्यक्त केला . यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक-2022 दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 .00 ते 4.00 वेळेत मतदारांनी महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पसंती क्रमांक 1 चं मतदान करून निवडून द्यावं असं आवाहन उमेदवार संजय शंकर यादव  यांनी केलं.