प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मागणी

कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी

अहमदनगर : मेट्रो न्युज 

प्रा. शिवाजी किसन होले ( नेप्ती ) शिक्षक  यांचा अज्ञात मारेकर्‍यांकडून हल्ला करण्यात आला होता.  मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना  निवेदन देण्यात आले. .

यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सचिव बाबासाहेब शिंदे, दीपक जाधव, भाऊराव नाडेकर, रमाकांत दरेकर, अवधुत आहेर, सुनिल पंडित, रंगनाथ जगधने, देवीदास पालवे, डी.व्ही. शिंदे, ज्ञानदेव बेरड, प्रा. रविंद्र देवढे, एम.एम. कांडेकर, सिताराम जपकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.

केडगाव बायपास परिसरात २३ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलातून गोळ्या झाडून प्रा. होले यांचा खून केला. अद्यापही या हत्येचा तपास लागलेला नसून, नेप्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका निष्पाप शिक्षकाचा बळी गेल्यामुळे संपूर्ण शिक्षक परिवारातुन  हळहळ व्यक्त होत आहे.

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जिल्ह्यातील शिक्षक वर्गाच्या वतीने करण्यात आली.