वंडर किड्स स्कुल मध्ये राष्टीय विज्ञान दिवस साजरा….

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमीत्त स्कुल मध्ये हे प्रदर्शन...

राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सावेडीतील पाईपलाईन रोड वरील श्री. रेणुका माता मंदिरा मागे असलेल्या वंडर्स किड्स  स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दीनानिमीत्त प्रदर्शनाचे आयोजन करून साजरा कारण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थांनी मानवी शरीराचे अवयव, दिवस आणि रात्र, ग्रह माला, पाण्याचे उपलब्ध स्रोत, सौर ऊर्जा या विषयावर आधारित अभ्यासपूर्ण आणि सुंदर अशी प्रात्यक्षिके सादर केली उपस्थित पाहुणे तसेच पालकांनी या प्रात्यक्षिकांचे कौतुक केले.
       राष्ट्रीय  विज्ञान दिनानिमीत्त स्कुल मध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सर्व  लहान मुलांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्कूलमध्ये असे विविध उपक्रम राबविले जातात.मुलांच्या या उपक्रमात सर्व शिक्षकांसोबत त्यांच्या पालकांनीही त्यांना  प्रात्यक्षिके तयार करण्यासाठी  मदत केली.
यावेळी तृप्ती कर्णावट, सुजाता तुवर, यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. पोर्णिमा मुंगसे, वंडर किड्स च्या संचालिका वैशाली अविनाश जाधव, आशा विनायक जाधव , आशा अनिल जाधव, अविनाश अकॅडमी चे प्रमुख अविनाश जाधव, मोनिका दार्वेकर आदी शिक्षक आणि वंडर किड्स स्कूलचा स्टाफ  आणि विद्यार्थाचे पालक आदि उपस्थित होते.
मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळावा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी शाळेने आयोजित केलेल्या अशा उपक्रमांची पालकांनी तोंड भरून स्तुती केली .
वंडर किड्स स्कूल मध्ये मुलांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. आणि मुलांना छान प्रकारे शिकवून त्यांच्या कडून अभ्यास करून घेऊन घेतला जातो. सर्व मुलांकडे अगदी जबाबदारीने लक्ष दिले जाते ,कोणाकडेही दुलक्ष केले जात नाही. या स्कूल मध्ये शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. अशा शब्दात पालकांनी स्तुती केली .
संचालिका वैशाली जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. सुजाता तुवर यांनी आभार मानले