शहर हद्दीत असलेला लिंक रोडचा जगताप मळा व भांबरे मळा होणार प्रकाशमय

ट्रांसफार्मर बसविणे व पोल टाक टाकण्यासह रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग क्रमांक 15 मधील शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लिंक रोड येथील अंधारलेले जगताप मळा व भांबरे मळा प्रकाशमय होणार असून, नागरिकांना घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता देखील मिळणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या 10 लाख रुपये निधीतून सदर भागासाठी शहरी लाईटचे ट्रांसफार्मर बसविणे व पोल टाक टाकण्यासह मुख्यमंत्री निधीतून 50 लाख रुपयाचे रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचे उद्घाटन नगरसेवक अनिल शिंदे यांच्या हस्ते झाले.
रोहिणी बालटे, मीनाक्षी भांबरे, अर्चना भांबरे, प्राची भामरे, अलका भांबरे, आशाबाई भांबरे, अर्चना जगताप, सविता जगताप, लक्ष्मी बालटे, यमुना भांबरे, गंगुबाई भांबरे, शिवाजी भांबरे, प्रमिला भांबरे, सुमन जगताप, जया जगताप, अश्‍विनी जगताप, संगीता भांबरे, माधुरी जगताप, रेखा भांबरे, ओम जगताप, प्रशांत जगताप, पारुनाथ ढोकळे, आशिष (मुन्ना) शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, राजू जगताप, हेमंत पोकळे, हेमंत बैरागी, जगदीश बैरागी, ननू भांबरे, सागर भांबरे, अशोक दातरंगे, मंगेश भांबरे, भाऊ शिंदे, बाबा भांबरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरालगत असलेल्या जगताप मळा व भांबरे मळा येथे ग्रामीण भागातून वीज असल्याने पंधरा ते अठरा तास भारनियमन, विजेचा कमी दाब यामुळे नेहमीच वीज नसल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर शेतीची कामे, पिकांना पाणी देणे, मुलांना संध्याकाळी अभ्यास करणे देखील शक्य होत नव्हते. शहरात राहून देखील नागरिकांवर दुर्गम भागात राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तर या भागात रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना घरा पर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. नागरिकांच्या या प्रश्‍नाची दखल घेवून नगरसेवक अनिल शिंदे यांनी पाठपुरावा करुन शहरी लाईटचे ट्रांसफार्मर बसविणे व पोल टाक टाकण्यासह जगताप मळा, भांबरे वस्ती ते लिंक रोड पर्यंत रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
पारुनाथ ढोकळे म्हणाले की, प्रभागातील शेवटच्या टोकापर्यंत विकास काम घेऊन जाण्याचे काम नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महत्त्वाचे प्रश्‍न सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल शिंदे म्हणाले की, शहरात राहून देखील नागरिकांना दुर्गम भागात राहण्याची परिस्थिती ओढवली होती. त्यांचा विजेचा व रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. शहरातून लाईट उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना वीजेसाठी मुकावे लागणार नाही. नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम सुरु आहे. काही लोकप्रतिनिधी फक्त मतदान मागण्या पुरते येतात, खरी कामाची गरज ओळखून कामे केल्यास मत मागण्याची गरज देखील पडणार नाही. नागरिकांनी देखील काम करणाऱ्यांना ओळखण्याचे त्यांनी सांगितले.