नालेगावच्या महादेव मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप

सातपुते तालीम मित्र मंडळ व नालेगाव ग्रामस्थांचा महाशिवरात्रीनिमित्तचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सातपुते तालीम मित्र मंडळ व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आमटी-भात, भाकरी ठेचा प्रसादाचा चार ते पाच हजार भाविकांनी लाभ घेतला. तर परिसरातील महिलांनी महादेवसाठी सव्वा सव्वा किलोचे विविध छप्पन खाद्यपदार्थांचे नैवेद्य बनविले होते.
महाप्रसाद वाटपाचे प्रारंभ माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी महादेवाची आरती करण्यात आली. तर सक्षम भावी पिढी घडविण्यासाठी अतुल दातरंगे यांनी स्वखर्चाने नुतनीकरण केलेल्या सातपुते तालिमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आशाताई किशोर डागवाले, अनुराधा देशमुख, नगरसेविका सोनाली चितळे, शेंडीच्या सरपंच प्रभागा लोंढे, अश्‍विनी खराडे, अश्‍विनी झुगे, ताराबाई शिंदे, सौ. चौरे, सौ. राठोड, अनिता कुर्ले, मंदा दातरंगे, रूपाली काळे, सुप्रिया चिलका, आरती दातरंगे, मंगल बोरुडे, गीतांजली डागवाले, अश्‍विनी डागवाले, सविता दातरंगे, सौ. पाखले, सौ. सोनवणे, सौ. डोळसे, राधा देवतरसे, अश्‍विनी साळवे, दिपाली शिंदे, पूजा भगत, लक्ष्मी बिटला, मनोज लोंढे, संदीप डागवाले, राजूभाऊ येनगुल, बबलू खराडे, मनोज पवार, लहानु शिंदे, संदीप पवार, रोहित डागवाले, अक्षय जाधव, दादू कवडे, अभिजीत गुगळे, अजय घुले, वैभव येनगुल, अतुल दातरंगे, प्रमोद काळे, राजू दातरंगे, प्रथमेश राजापुरे, गौरव ससाणे, भैय्या दातरंगे, दिनेश दातरंगे, दत्तात्रय लोंढे, पियुष चितळे, संतोष शिंदे, चेतन येनगुल, आदित्य हावरे, शुभम धोंडे, ओमकार मिरगु, सोमेश अकोलकर, अभिजीत भगत, आशुतोष वाघमारे, अक्षय पाखरे, धीरज आव्हाड, शरद कोंडा, अक्षय दातरंगे आदींसह परिसरातील भाविक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किशोर डागवाले म्हणाले की, सातपुते तालीम मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम राबवून समाजात उत्तमपणे कार्य सुरु आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या मोठ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते. युवकांनी धार्मिक कार्यासाठी व भावी पिढीच्या सदृढतेसाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहन डागवाले म्हणाले की, मोबाईलमुळे येणारी भावी पिढी संस्कार, धार्मिक परंपरा व निरोगी जीवनाकडून लांब जात आहे. भावी पिढीत आपली संस्कृती रुजविण्यासाठी व तालिमीद्वारे सदृढ युवक घडण्यासाठी सातपुते तालीम मित्र मंडळाचा पुढाकार आहे. नवोदित मल्लांना तालिममध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करुन त्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
छप्पन भोगच्या अन्नपदार्थाचे मंदिरात आकर्षक पध्दतीने सजावट करुन मांडण्यात आले होते. यामध्ये मिठाईसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. यावेळी भाविकांनी महादेवाचा एकच जयघोष केला. भगवान शंकराच्या वेशभुषेत आलेल्या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधले. या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील महिलांनी परिश्रम घेतले.