ॲड. महेश शिंदे व ॲड. शकीलअहमद पठाण यांची नोटरीपदी नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विधीज्ञ ॲड. महेश दत्तात्रय शिंदे व ॲड. शकीलअहमद शब्बीर पठाण यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. महेश शिंदे व ॲड. शकीलअहमद शब्बीर पठाण जिल्हा व सत्र न्यायालय आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात वकिली व्यवसाय करीत आहे. ॲड. शिंदे जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. सामाजिक क्षेत्रात गेल्या वीस वर्षापासून शासनाच्या निविध योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविण्याचे काम ते करत आहे. तर ॲड. पठाण हे देखील सामाजिक क्षेत्राशी जोडले गेलेले आहे. दोन्ही वकिल समाज कार्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे.
या दोन्हींचा नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. वाल्मिक तात्या निकाळजे, ॲड. बाबूराव अनारसे, ॲड. दिलीपराज शिंदे, ॲड. संतोष शिंदे, ॲड. सुरेश लगड, ॲड. अनिता दिघे, ॲड. प्रणाली चव्हाण, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. सुनिल तोडकर, ॲड. विद्या शिंदे, तसेच सामाजिक क्षेत्रातील चंद्रकात पाटोळे, रावसाहेब मगर, पोपटराव बनकर, आरती शिदे, बाबू काकडे, दिनेश शिंदे, गोरखनाथ ओहळ, संभाजी कोकाटे, मिना म्हसे, डॉ.सरीता माने, सुहास सोनवणे, सुनिल गायकवाड, अशोक कासार, विजय भालसिंग, अनिल साळवे, कल्याणी गाडळकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.