रेल्वे स्टेशन बोहरी चाळ गवळीवाडा येथिल रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

रेल्वे स्टेशन सर्वात जुने उपनगर असून शहराची ओळख- आमदार संग्राम जगताप.

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील बोहरी चाळ गवळीवाडा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, संभाजी पवार, दत्ता खैरे, चंदू औषिकर, अरुण नाणेकर, महेश सुपेकर, बाळासाहेब ठाणगे, महेश रपारीया, संभाजी नामदेव, आनंद औषिकर, सोन्या बापू औषिकर, किशोर औषिकर, संतोष दहीहंडे, मनीषा नहार, भागवत बांदल सर, भाऊसाहेब चौधरी, नंदू लांडगे, भारत कदम, सुनील लांडगे, विलास भिंगारदिवे, शशिकांत लाटे, महाळू शिपणकर, मडो मोमीन, कौसर पटेल, जयश्री डहाळे, पप्पू शेख, युनूस मोमीन, जावेद शेख, रावसाहेब दळवी, पप्पू ठोबे आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रेल्वे स्टेशन परिसर हे सर्वात जुने उपनगर असून रेल्वे स्टेशन परिसर ही शहराची ओळख आहे. या परिसरात रेल्वे स्टेशन असल्याने या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. या भागातील नगरसेवक विजय गव्हाळे यांनी त्यांच्या काळात चांगले कामे करून या परिसराची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मात्र आत्ताच्या पाच वर्षात माणूस सापडत नाही व प्रभागातील नागरिकांच्या समस्या सुटल्या नाही. का? कामे होत राहतात. मात्र माणसं उपलब्ध पाहिजे स्टेशन भागातील दगडी पूल काढून आरसीसी पुल बांधण्यात आलेला आहे. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना नको यासाठी हे करण्यात आले व रेल्वे स्टेशन कायनेटिक चौक येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याची भावना व्यक्त करत स्टेशन परिसर विकसित होत असून स्टेशन रोड ते आगरकर मळा व काटवन खंडोबा रोड हे शहरांमध्ये येण्यासाठी लवकरच चालू होणार असल्याची भावना व्यक्त केली तर माजी नगरसेवक विजय गव्हाळे म्हणाले की, पद असो की नसो नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कुटी बद्ध असून आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून कामे करून घेत असल्याची भावना व्यक्त करत नगरसेवक हे प्रभागाच्या समस्यांवर लक्ष ठेवून समस्या सोडवण्याचे सांगितले व प्रभागातील नागरिकांनी आप आपले मनोगत व्यक्त केले की, प्रभागात कामे करणारा व्यक्ती लागत असतो पद असो की नसो प्रभागात पाठपुरावा करून कामे पूर्ण करून घेतात व प्रभागातील नागरिकांकडून पाच वर्षापूर्वी झालेली चूक ही नागरिक येणाऱ्या निवडणुकीत सुधारणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत लाटे सर यांनी केले आभार संभाजी पवार यांनी मानले…