सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

वडगाव गुप्ता हद्दीत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकासाठी मोकळी जागा मिळण्याची मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील वरखेड ते शिरसगाव रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करताना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे समवेत साहेबराव पाचरणे, निलेश चांदणे, विजय वैराळ, राजू पवार, मनीष वैराग, संजय चांदणे, बाळासाहेब वाघमारे, बाबुराव वाल्हेकर, रामदास उमाप, अभय पतंगे, सुधीर वैरागर, विजय पाचारणे, भगवान जगताप, अभय पतंगे, शांताराम पाचारणे, अल्लाउद्दीन पठाण, विजय वडागळे, दत्ता वामन, बाळासाहेब मोरे, कैलास साळवे, पोपट शिंदे, बाबासाहेब वाघमारे, श्रीरंग अडागळे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, ३१ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिकाऱ्यांची तहसीलदार कार्यालयात बैठक होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा यांना रस्ता दुरुस्त करण्याची सूचना देण्यात आली. परंतु अद्यापही रस्ता दुरुस्त झालेला नाही. तरी शिरसगाव ते वरखेड ता.नेवासा जिल्हा अहमदनगर येथील रस्ता रुंद करून त्वरित डांबरीकरण करण्यात यावे व साईडचे बाबळी तोडण्यात यावे ग्रामपंचायत वरखेड सरपंच व ग्रामसेवक यांनी रस्त्यासंबंधी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदने दिलेली आहे. त्याचप्रमाणे येथे मंदिराजवळची खान बुजून जागा उपलब्ध करून द्यावी तसेच येत्या महिनाभरात रस्ता दुरुस्त न झाल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच नगर मनमाड रस्त्यावरील वडगाव गुप्ता येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय भव्य स्मारकासाठी ग्रामपंचायत हद्दीतील ५९५/१ मधील मोकळी जागा मिळण्यासाठी २०१७ पासून आज पर्यंत पाठपुरावा चालू असून आत्तापर्यंत जागा मिळालेले नाही. तरी महाराष्ट्र शासनाची मोकळी जागा असून या जागेचा नकाशा मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे…