वाचनातून ज्ञान व ज्ञानातून लेखनकौशल्ये विकसित होतात -दिलीप चव्हाण

न्यू आर्टसच्या इन्हानसिंग रायटिंग स्किल्स इन इंग्लिश या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- गंभीर स्वरूपाचे चौफेर वाचन, साहित्यीक वाचन हे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे स्त्रोत आहेत. वाचन व ज्ञानाधिष्टीत शिक्षणप्रद्धतीतून सर्व भाषिक क्षमता विकसित होतात. यातूनच लेखन कौशल्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन आर्ष पब्लिकेशनचे (पुणे) संपादक, दिलीप चव्हाण यांनी केले.
न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात आयोजित इन्हानसिंग रायटिंग स्किल्स इन इंग्लिश या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी चव्हाण बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेचे उपप्राचार्य तथा इंग्रजी विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दिलीप ठुबे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपसस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अर्चना रोहोकले यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेसाठी प्रा.डॉ. पंढरीनाथ शेळके, प्रा.डॉ. जयश्री आहेर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय आमले यांनी केले. आभार डॉ. उज्वला गायकवाड यांनी मानले. यावेळी डॉ.व्ही.बी. दोडे, प्रा. मनीषा आढाव, डॉ. वैष्णवी कलेढोणकर उपस्थित होते.