केडगावच्या समता नगरमध्ये भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

केडगाव येथील समता नगरच्या समाज मंदिरात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, लताताई शेळके, मनोज कोतकर यांच्या पुढाकाराने भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीचा लोकार्पण सोहळा उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते पार पडला.

नगरसेवक राहुल कांबळे म्हणाले की, समाज एकजुटीने एकत्र येऊन विकास साधण्याच्या उद्देशाने प्रत्येक हरिजन व दलित वस्तीमध्ये समाज मंदिर असावा ही माजी महापौर संदीप कोतकर यांची संकल्पना होती. या उद्देशाने त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात समाज मंदिर उभे राहिले. त्यांनी ६५लाख रुपयाच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले. त्याचा उपयोग सर्वसामान्य समाजातील नागरिकांना होत आहे. समाज मंदिर हे सामाजिक व वैचारिक चळवळीचे केंद्र असून,  या समाजमंदिरातून नागरिकांना बुध्दांच्या विचारांची प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पुज्यणेय भन्ते व बाल भिक्खू संघाने यांनी भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली. यावेळी आंबेडकर चळवळीतील सुनील साळवे, किरण दाभाडे, अ‍ॅड. संतोष गायकवाड, रोहित आव्हाड, शेखर पंचमुख, कौशल गायकवाड, विवेक भिंगारदिवे, अविनाश भोसले, गौरव साळवे, हर्षल कांबळे, बाळासाहेब गायकवाड, पँथर सेनेचे अतुल भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ, बौद्धाचार्य संजय कांबळे, दीपक अमृत, मिलिंद आंग्रे, प्रकाश कांबळे, विष्णू ढोंबे, रघुनाथ गायकवाड, लक्ष्मण माघाडे आदींसह केडगाव परिसरातील नागरिक व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.