उद्धव ठाकरे यांची पत्रकारांशी चर्चा

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. आज तुम्ही मला भेटयला का आला आहात?  मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आमच्या पक्षाचा नाव ,चिन्ह चोरण हा पूर्वनियोजित कट होता असे ते  म्हणाले. तुम्ही आमच्या  पक्षाच नाव चिन्ह चोरू शकता पण आमच ठाकरे नाव हे  नाही चोरू शकत नाही . खरंतर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याने उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती.त्या आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.

निवडणूक आयोगाला  चिन्ह, आणि पक्षाच नाव ठरवण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोग हुकूम करू शक्त नाही . त्यामुळे निवडणूक  आयोगाने दिलेला हा निकाल अयोग्यच आहे अस त्यांनी सांगितले. त्यामुळे २०२४ नंतर जी लोकसभा निवडणूक होईल ती फक्त हुकुमशाही असेल ,असे ही ते म्हणाले. देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप करत  २०२४ च्या निवडणुका होणार नाहीत असेही उद्धव ठाकरे यांनी म्हणत शिंदे गटावर चोर म्हणत हल्लाबोल केला आहे.

देशातील कोणत्याही पक्षावर ते ही परिस्थिती आणू शकतात. आताच ही परिस्थिती रोखली नाही तर देशात कदाचित २०२४  ची निवडणूक शेवटची असेल.

बाळासाहेब आणि माँच्या पोटी मी जन्माला आलो हे भाग्य आहे. ते भाग्य त्यांना मिळणार नाही. दिल्लीवाले त्यांना ते भाग्य देऊ शकत नाही. ते कितीही उतले मातले तरी करू शकत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

अंधेरीचे  निमित्त सांगून आमच्या कडून पक्षाच नाव आणि चिन्ह गोठवले गेले. गुंता वाढवा म्हणून त्यांनी घाईघाईने निकाल घेतला .  निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र,पदसंख्या  सादर करायला लावली होती. आम्ही बोगस पत्र दिले असे त्यांनी दाखविले. त्यांनी आमचा वेळ आणि १०० रुपयाचा स्टॅम्प  सगळे वाया घालवले. निवडणूक आयोगाने आम्हाला संगितले म्हणून आम्ही त्यांना त्यांना सगळी  कागदपत्रे  दिली असे ही ते म्हणाले. निवडणूक आयोगाला आम्ही जी कागदपत्रे  दिली आम्हाला रद्दी  वाटत होती म्हणून दिलेले नाहीत.

जे धनुष्यबाण रावणाला  नाही पेललं ते निंध्याला काय  पेलणार ? असा टोला उद्धव ठाकरेंनी लावला . निवडणूक आयोग ही बरखास्त केली पाहिजे .ती सुलतान नाही . जनता  हे निस्वार्थी भावनेने बघत असतात.जोपर्यंत .

राजनीती मध्ये  ‘मा’ म्हणजेच शिवसेना ची हत्या ही घरातल्याच व्यक्तीने केली आहे. माझ्या वडिलांचे नाव चोरण्यापेक्षा  स्वतःचे  नाव लावा , स्वतःच्या  वडिलांचे नाव लावा,   मी  वर्तमानपत्रा सारखा  आहे. वर्तमानपत्र प्रमाणे चालतो. असे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.