निरोगी भारत घडविण्यासाठी शहरात स्वच्छता मोहिम

स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते

आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील लालटाकी अप्पूहत्ती चौक ते दिल्लीगेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.यामध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा चालक या मोहिमेत सहभागी झाले होते.यावेळी संघटन मंत्री प्रा. अशोक डोंगरे, शहर कार्याध्यक्ष भरत खाकाळ, दिलीप घुले, गणेश मारवाडे, कदम आदी उपस्थित होते.

निरोगी आरोग्य व आरोग्यदायी वातावरणासाठी नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन करीत  परिसर स्वच्छ करुन मोठ्या प्रमाणात आजूबाजूला साचलेले प्लास्टिक व इतर कचर्‍यांचे संकलन करण्यात आले .नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.

परिसर स्वच्छ असल्यास रोगराई न पसरता नागरिकांचे आरोग्य निरोगी राहते , निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक असून, याची सुरुवात स्वत:पासून होणे गरजेचे आहे.  जीवन आरोग्यमयी होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. अस्वच्छतेने रोगांना निमंत्रण मिळत आहे. नागरिकांनी स्वच्छतेसाठी जागरुक राहिल्यास सर्वांना निरोगी व आनंदी जीवन जगता येते. असे या मोहीमध्ये सांगण्यात  आले.