सुनील गोसावी यांच्या आठवणींचा ‘डोह’ ला ‘जाई प्रतिष्ठान’ चा साहित्य पुरस्कार जाहीर

अहमदनगर : मेट्रो न्यूज

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी कोरोना काळात लिहिलेल्या आठवणींचा डोह या सूक्ष्म कथात्मक आत्मचरित्र ग्रंथास राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील जाई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा धोंडीराम गेनू भोसले स्मृती वाडमय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.
चिंचोलीतील जाई प्रतिष्ठानने यावर्षापासून समाजातील सामाजिक बांधिलकी जपत अतूलनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांना सन्मानित केले जाणार असुन यावर्षी साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार दिले जाणार आहेत.

त्यात धोंडीराम गणू भोसले स्मृती वांड्मय पुरस्कार सुनील गोसावी यांच्या ‘आठवणींचा डोह’ (सूक्ष्म कथात्मक आत्मचरित्र), अनुसयाबाई धोंडीराम भोसले स्मृती वाड्मय पुरस्कार स्री जाणीवेच्या ग्रामीण कवितेतील विशेष कार्याबद्दल चंद्रकला आरगडे, रामचंद्र मोहन मांजरेकर स्मृती वाड्मय पुरस्कार कवी चंद्रकांत पालवे यांच्या मोहोर उजेड वाटांवर या कवितासंग्रहास तर जाई पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांना जाहीर करण्यात येतं आहेत.

स्मृतीचिन्ह, शाल, व एक हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी चिंचोली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शाल व सावलीचा आधार असलेला वृक्ष देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दिनांक २१ मे २०२३ रोजी चिंचोली ता.राहुरी येथे कविवर्य आ. लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध साहित्यिक,महाराष्ट्राचे लोककवी प्रशांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे, लोकसत्ता संघर्ष चे संपादक प्रकाश ओहोळ, साहित्यिक भास्कर निर्मळ, उद्योजक दिलिप जगताप यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले व सचिव पत्रकार बाळकृष्ण भोसले यांनी जाहीर आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.