मुलांसह पालकांच्या व्यक्तिमत्व विकासात

मोलाची भर घालण्यात इरा किड्स यशस्वी

मुलांसह पालकांच्या व्यक्तिमत्व विकासात
मोलाची भर घालण्यात इरा किड्स यशस्वी
५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रसिद्ध खडू शिल्पकार अशोक डोळसे यांचे गौरवोद्गार
अहमदनगर गेल्या ५ वर्षांपासून इरा किड्स स्कुल मध्ये मुलांसह पालकांच्या सहभागाचे उपक्रम राबविले जात यातून मुलांसोबत पालकांच्या विविध कला गुणांना चालना मिळते आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो ही मोलाची भर घालण्यात इरा किड्स यशस्वी ठरले असे गौरवोद्गार प्रसिद्ध खडूशिल्पकार अशोक डोळसे यांनी काढले
एम आय डी सी नागपूर बोल्हेगाव परिसरातील मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या इरा किड्स प्री स्कुल चे ५ वे वार्षिक स्नेह संमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून डोळसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्कुलचे संचालक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सिव्हिल इंजिनियर रमेश साळुंके, संचालिका प्राचार्या सौ. अर्चना साळुंके, प्रसिद्ध वारली चित्रकार हर्षदा डोळसे, इंजिनीयर प्रसन्न साळुंके उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोलताना डोळसे पुढे म्हणाले की , मुलं ही दिवाघरची फुले असतात असे आपण म्हणतो, नव्हे ते खरेच आहे , कारण मी देखील दिवसभर अशाच प्रकारे मुलांमध्येच असतो. त्यांच्या सोबत वावरताना आपण विलक्षण आनंदित असतो. मुलामध्ये रमणे ही ईश्वरीय आनंदाची अनुभूती आहे.
इरा किड्स मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवते त्यांना हस्तकला, चित्रकला, नृत्य शिकवले जाते या उपक्रमात पालकांना देखील सहभागी करवून घेतले जाते त्यातून संपूर्ण कुटुंबाच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व खुलते हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे ते म्हणाले
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्या सौ साळुंके म्हणाल्या की, इरा स्कुल मुलांबरोबरच पालकांना देखील विविध उपक्रमात सहभागी करून घेते. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देते. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक वर्षी मुलांची प्रगती विलक्षण होते. त्यामुळे पालक आम्हाला आता एल के जी यु के जी नंतर इयत्ता १ ली , २ री सुरु करा असा आग्रह धरत आहेत. हा प्रतिसाद आम्हाला नवनवीन उपक्रम राबविण्याची उभारी देतो . लवकरच आम्ही पुढच्या इयत्ता सुरु करण्याचा विचार करीत आहोत. पालकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत व सत्कार झाला. नंतर दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. पारितोषिक वितरण समारंभ आणि पालकांचा सत्कार रेणुका यादव बनकर मॅडम अमोल थोरात, श्री व सौ अल्हाट डॉ. अर्चना हिवाळे, यांनी आपली मनोगत व्यक्त केली या पालकांचा सत्कार करण्यात आला. . वर्षा मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.
नंतर मुलांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
वर्षा राऊत, प्रियांका सांगळे, कांचन वाघमारे, वंदना झिरपे सुप्रिया बनकर, यांनी प्रयत्न केले यांनी प्रयत्न केले