गणेश जयंती निमित्त मिसाळ गल्लीतल्या टिटवाळा मंदिरात गणेश जयंती उत्सव साजरा

खासदार सुजय विखे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप

गणेश जयंती निमित्त मिसाळ गल्लीतल्या टिटवाळा मंदिरात गणेश जयंती उत्सव साजरा
खासदार सुजय विखे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप
वार्ड क्रमांक ९ मध्ये भाजपचे घर घर चलो अभियानात वॉल पेंटिंग आणि पोस्टर चे वितरण

अहमदनगर इथल्या मिसाळ गल्लीत असलेल्या टिटवाळा गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी पार पडला याचा समारोप खासदार सुजय विखे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटून झाला. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, माजी महापौर मालनताई ढोणे, सचिन पारखी, दिलीप ढोणे, यशवंत ढोणे, धनंजय जाधव, प्रकाश बायड, दिलीप लुंकड, कालिंदी केसकर, प्रताप परदेशी, कल्पेश परदेशी, निलेश येनगंदुल, सतीश शिंदे, अजय ढोणे, संजय ढोणे, प्रवीण ढोणे, पियुष लुंकडे, राहुल जामगांवकर, ऋषिकेश ढोणे, नितीन शेलार, निखिल वारे, प्रशांत मुथा, अभिजित ढोणे, विक्रम शिंदे रुद्रेश अंबाडे,दीपक देहरेकर, शांताराम बिडवे मिथुन मिळवाल , विक्रम शिंदे, पपू बलदवा, अजिंक्य कोळपकर, अरिफ शेख, दिलीप दारुणकर , टिउ महाराज, अक्षय ढोणे, अभिजित ढोणे , अश्विन राठोडमुकुन्द ऍंगांडूळ, अमोल ढोणे, धनंजय निमंबालकर, दत्तात्रेय बेटी दत्तात्रेय बागडे, शशांक ढोणे, अनिकेत ढोणे, उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते श्री गणेशाचं महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली. परिसरातील भाविकांनी आणि वॉर्ड क्रमांक ९ मधील सर्वानी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्मक्रमासाठी विशेष सहकार्य बापू गीते, विशाल चिन्चोने, दीपक भीमन पेलली तेजस डहाळे विकी आव्हाड, समीर शेख संदीप लिमकर यांनी केले.
यानंतर खासदार सुजय विखये यांच्या हस्ते प्रभाव क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या घर घर चलो अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , महाराषट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे फोटो असलेले वॉलपेंडीग कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रभागाच्या प्रमुख नगरसेविका माजी महापौर मालनताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने दिवार लेखन घर घर मोदी अभियान सुरु करण्यात आले आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे . त्याचे वाटप या अंतर्गत सुरु करण्यात आले आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.