जामीनावर सुटताच गेवराई डॉक्टर नर्सचा पुन्हा गर्भलिंगनिदनाचा उद्योग

डमी ग्राहक पाठवून भांडाफोड बडतर्फे अंगणवाडी सेविका ताब्यात
घर मालक चंदनशिवाल अटक डॉक्टर सतीश गवारे मात्र निसटला
जून 2022 मध्ये गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणात अटक केलेली गेवराईची बडतर्फे अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिने जालना येथील डॉक्टर सतीश गवारे यांच्या मदतीने पुन्हा अवैध गर्भलिंगदानाचा धंदा सुरू केला होता बीडच्या प्रकरणात सानपची नऊ महिन्यापूर्वी तर जालन्याच्या प्रकरणात डॉक्टर गवारीची दोन महिन्यापूर्वी जामीनावर सुटका झाली होती आरोग्य विभाग व पोलिसांनी डमी रुग्ण पाठवून गुरुवारी गेवराई छापा टाकला यात मनीषा सानप व घर मालकाला पकडले गेले तर डॉक्टर गवारे पोलिसांच्या तावडीतून निसटून फरार झाले दरम्यान यामुळे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या गर्भलिंगनिदानाचा प्रकार पुन्हा समोर आला बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शीतल गाडे या महिलेच्या मृत्यूनंतर जून 2022 मध्ये गर्भलिंगनिदान करून गर्भपात करणारे रॅकेट समोर आले होते यात बडतर्फे अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप राहणार अर्धमसाला तालुका तालुका गेवराई हल्ली मुक्काम गेवराई ही गर्भलिंगनिदानासाठी ग्राहक फिरून जालन्याच्या डॉक्टर गवारे यांच्या सहायकाकडून गर्भलिंगनिदान करून घेत होती जामिनावर सुटतात मनीषा पुन्हा गर्भलिंगनिदानाची रॅकेट गवारेसह सुरु केले होते याबाबत 29 डिसेंबर 2023 रोजी राज्याचे आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती ही तक्रार बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांच्याकडे आल्यानंतर यांनी जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार ठाकूर एएसपी सचिन पांडकर यांच्याशी चर्चा करून कारवाईचे नियोजन केले पोलीस विभागातील गर्भवती कर्मचारी महिलेच्या माध्यमातून मनीषा शी संपर्क केला गेला होता गुरुवारी मनीषाने गर्भलिंगनिदानासाठी गेवराईत बोलवले होते सापळा रचून पोलिसांनी आरोग्य विभागाने गेवराईच्या संजय नगर भागात छापा टाकला यावेळी मनीषा सानप घरमालक चंद्रकांत चंदनशिव पकडले गेले तर गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टर सतीश गवारे पोलिसांच्या तावडीतून निसटला या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा नोंदवला गेला